जितेंद्र आव्हाडांनी चुकून फाडला बाबासाहेबांचा फोटो, राजकीय वातावरण तापलं

Jitendra Awhad | राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी माहिती समोर आली आहे. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला जाणार असल्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. याविरोधात महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यापासून विरोध केला. त्यानंतर त्यांच्या समता परिषदेने देखील याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केलं.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या वर्गात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र याला आता काही नेत्यांनी त्याला विरोध केला. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारधारेने आजपर्यंत राहिली आहे, मनुस्मृतीपेक्षा शाहू, फुले, आंबेडकर आणि आण्णा भाऊ साठे यांचं चरित्र अभ्यासाला द्यावं, असं ते म्हणाले होते.

अशातच आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाड येथे दाखल झाले आहेत. तसेच त्यांनी महाडच्या चवदार तळ्या येथे मनुस्मृतीचं दहन केल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या या कृतीमुळे विरोधकांचा पारा वाढलेला दिसत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या हातून आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र मनुस्मृती दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, तेव्हा मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडत असताना, त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षातच आलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

याआधी 1927 साली याच ठिकाणी महाडमध्ये डॉ. बाबासेहब आंडेबकर यांना मनुस्मृतीला विरोध केला होता. त्याच ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचं दहन केलं. यावेळी पोहोचण्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी टिपणीस यांच्या कुटुंबाची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी चवदार तळाजवळ काही मनुस्मृतीच्या श्लोकांचे वाचन केल्याची माहिती समोर आली आहे.

“केसरकरांची बुद्धी आंबेडकरांपेक्षा जास्त आहे का?”

तसेच मनुस्मृतीचे दहन हे त्यावेळीच्या पुरोगामी नेत्यांनी केलं होतं. त्यामुळे आम्ही नोटीशींना घाबरणारे नाहीत. केसरकरांची बुद्धी आंबेडकरांपेक्षा जास्त आहे का?, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे. जर मनुस्मृतीचे दोन श्लोक जर शालेय अभ्यासात समावेश झाले तर आता अजित पवार हे राजीनामा देणार का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.

यचपार्श्वभूमीवर मनुवाद्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनुवाद्यांनी चवदार तळे शुद्धीकरण केलं. त्यानंतर चवदार तळ्याने पाणी प्रशान करून बाबासाहेबांनी ते तळे लोकांसाठी खुले केले. सुकाणु समितीच्या अध्यक्षा कोण आहेत? त्यांना मनूच का लागतो? तुम्ही जर सुधारणावादी आहेत तर मग तुकारामांचे अभंग का घेत नाही. आपली मुलं ही मनुच्या संस्कारात वाढणार आहेत का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

News Title – Jitendra Awhad News Update About Manusmriti Chavdaar Tale

महत्त्वाच्या बातम्या

‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने… बातमी वाचून काळजाचा थरकाप उडेल

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, ‘या’ सेवेत बँकेकडून मोठा बदल

सातबाऱ्यामध्ये होणार बदल, महसूल विभागानं घेतला सर्वात मोठा निर्णय

कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती, डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला