मुंबई | कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने राज्यभर ‘माझे अंगण, माझे रणांगण’ हे आंदोलन केलं. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले. भाजपच्या याच आंदोलनाचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.
संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्रद्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली आहे.
कोोरनासारख्या जागतिक संकटाच्या काळात भाजपने महाविकास आघाडीविरोधात केलेलं आंदोलन जनता कधीही विसरणार नाही आणि जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असंही आव्हाड म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी देशातील 20 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला. तसंच कोरोनाचं संकट हाताळण्या उद्धव ठाकरे सरकार कमी पडलं असल्याची टीका फडणवीसांनी केली.
संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्या साठी एकी महत्वाची असताना #महाराष्ट्रद्रोहीBJP ने आंदोलन करून दुही ची बीजे पेरली
जनता हे विसरणार नाही आणि माफ ही करणार नाही#सत्तेचा_हव्यास— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 23, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?
…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले
महत्वाच्या बातम्या-
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…
महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…
सर्वसामान्यांसाठी छगन भुजबळांनी केंद्र सरकारकडे केली ही महत्त्वाची मागणी
Comments are closed.