गोरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत; जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई | बुलंदशहर हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. 

उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरमध्ये प्रामाणिक पोलिस अधिकारी सुबोधकुमार, ज्यांनी अख्खलाखच्या खुनाची चौकशी केली होती व आरोपींना पकडले होते, त्यांचीच हत्या करण्यात आली. ही हत्या गौरक्षकांनी केली गौरक्षक आहेत आणि माणसं मारत आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

सुबोध कुमार यांना गोळी झाडण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, सुबोध कुमार दादरी हत्याकाडांचे तपास अधिकारी होते, तसेच ते या प्रकरणातील सातव्या क्रमांकाचे साक्षीदार सुद्धा होते.

महत्वाच्या बातम्या-

-तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आदिवासी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

-बुलंदशहर हिंसाचाराचं दादरी कनेक्शन; मृत पोलीस अधिकारी होते साक्षीदार

-शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला घेरणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

-सर जिओ नहीं चल रहा है; ग्राहकाची थेट मुकेश अंबानींकडेच तक्रार!

-महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा