मतमोजणीत झालायं मोठा घोळ; आव्हाडांनी सादर केली धक्कादायक आकडेवारी

Jitendra Awhad on EVM

Jitendra Awhad on EVM l विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा पराभव झाला आहे. मात्र या निकालानंतर राज्यातील अनेक नेतेमंडळींनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम यंत्राबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी सादर केली आकडेवारी :

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये, म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती. परंतु, आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत देखील माहिती दिली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी ट्विटद्वारे सादर केली आहे. यावेळी कन्नड विधानसभा मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार 396 आहेत आणि या गावात 312 जणांनी मतदानाचा हक्क बाजवळ होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे यावेळी उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Jitendra Awhad on EVM l मतदान झाले 312, मतमोजणीत निघाले दुप्पटीने मते :

तळनेर या गावात 312 जणांनी मतदान केले असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 194, शिवसेना शिंदे गटाला 326, तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 104 असे मतदान झाले आहे. मात्र या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ही 624 इतकी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर नेमकं कोण देणार? तसेच हे प्रकरण लवकरच उघडकीस आणू! अशी पोस्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कारण प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदान यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे उघडकीस आले आहे.

News Title – Jitendra Awhad on EVM

महत्वाच्या बातम्या-

… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!

दिल्लीतून ‘तो’ निरोप आला अन् इकडे एकनाथ शिंदे रूसल्याच्या चर्चेला उधाण

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

सरकारकडून Pan Card संबंधी मोठा बदल; जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, कारण..

नागराज मंजुळेंच्या अडचणीत मोठी वाढ; नेमकं काय प्रकरण?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .