नरेंद्र मोदींना सत्ता महत्वाची आहे, देशाचं भलं नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्ता महत्वाची आहे, देशाचं भलं नाही, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक रद्द झालेल्या भेटीबद्दल आव्हाडांनी विश्लेषणात्मक पोस्ट केली आहे.

दरम्यान, जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायला भारत-पाकिस्तान दुष्मनी हा संवेदनशील विषय त्यांनी कावेबाजपणे निर्माण केला. आता पुन्हा जो तणाव वाढेल, मोदी भक्त तो वाढवतील, आणि त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्त्वाची आहे, देशाचं भलं नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-5 हजार कोटींचा चुना लावून गुजराती व्यवसायिक परदेशी पळाला!

-मुंबई पोलिसांची धडक कारवाई; पुणे पोलीस फक्त पंचनामे करत बसले!

-डीजेला परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिसाचं डोकं फोडलं

-…म्हणून लग्न केलं नाही; एकता कपूरचा धक्कादायक खुलासा

-विश्वास नांगरे-पाटलांवर गुन्हा दाखल करा; तृप्ती देसाईंची मागणी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या