मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहंमत्री पी. चिदंबरम यांची चौकशी म्हणजे एक राजकीय दबावतंत्र आहे. इंदिरा गांधी यांच्याबाबतही असच घडलं होत. इंदिरा गांधींना तुरुंगात टाकल्यानंतर इंदिरा गांधींना न माननारी लोकही इंदिरा गांधींच्या पाठिशी उभी होती, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.
राज ठाकरेंची चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे त्यांच्या परिवारावर कोणी टिका करू नये. ईडी म्हणजे सरकारचा राजकीय स्टंट आहे, असं म्हणत त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरू आहे ईडीच्या दबाव तंत्रामुळेच सर्व नेते सेना-भाजपात जात आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी भाजप सेनेवर केला आहे.
सरकारने हे सुडाचे राजकारण बंद करावे. तपासात सर्व सत्य समोर येईल. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत ईव्हीएम हटाव सगळं सत्य बाहेर येईल, अस म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून?? अगोदरच चौकशी व्हायला हवी होती” https://t.co/rsylmaGKHt @anjali_damania @RajThackeray @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) August 22, 2019
“बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत” – https://t.co/pIedJE017S
— थोडक्यात (@thodkyaat) August 22, 2019
पी. चिदंबरम यांना 14 दिवसांची कोठडी?, वाचा थोडक्यात- https://t.co/V7v9WM0Dhq @PChidambaram_IN
— थोडक्यात (@thodkyaat) August 22, 2019
Comments are closed.