महाराष्ट्र मुंबई

…नाही तर त्या रामदेव बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई | रामदेव बाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांंच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत त्यांनी माफी मागावी, नाही तर मी त्या रामदेव बाबाला महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामास्वामी हे वैचारिक दहशदवादी होते, असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. त्यांच्या याच विधानावरून रामदेव बाबांवर टीका केली जात आहे. बाबा रामदेव यांच्या याच विधानावरून आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचं जाती निर्मुलनात मोठं योगदान आहे. त्यांच्याविषयी असं बोलणं शोभणारं नाही. रामदेव बाबा कुठल्या विचारधारेला मानतात, याच्याची आम्हाला काहीही घेणं देणं नाही. रामदेव बाबांनी माफी मागावी, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांच्या या विधानामुळे नेटकरी चांगलेचं खवळलेत. #ArrestRamdev हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.

 

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट-

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या