सैफवरील हल्ला पुर्वनियोजित कट?; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jitendra Awhad | अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री वांद्रे येथील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील या प्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्यावर एका अज्ञात चोराने घरात घुसून वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. (Saif Ali Khan Attack)

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला

त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा लागल्या आहेत. यापैकी दोन जखमा अत्यंत खोल असून एक जखम ही पाठीच्या कण्याजवळ लागली आहे. हल्ला झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सैफ वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत राहतो. याच इमारतीच्या 12 व्या मजल्यावर हा सर्व प्रकार घडला.

या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत मोठी शंका उपस्थित केली आहे.  ज्या पद्धतीने वार करण्यात आले ते पाहता, यामागे धार्मिक कट्टरता असलेला व्यक्ती तर नाही ना? अशी शंका आव्हाड यांनी व्यक्त केली. त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. या प्रकरणी त्यांनी गंभीर सवाल देखील उपस्थित केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट काय?

सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.

कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष!, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

News Title : Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! सैफवरील हल्ल्यानंतरचं CCTV फुटेज समोर

डॉक्टरांना सैफच्या शरीरात आढळली धक्कादायक बाब!

सैफसोबत आधी वाद झाला नंतर हल्ला?, अत्यंत खळबळजनक माहिती समोर

संजय राऊतांनी सैफच्या हल्ल्याच मोदींशी कनेक्शन जोडलं, म्हणाले….

सैफ अली खानच्या मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर