हा फोटो कुणाचा?, आव्हाडांकडून भिडे गुरुजी पुन्हा लक्ष्य

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या संभाजी भिडे यांना लक्ष्य केलंय. मीरज दंगलीतील संभाजी भिडे यांचा फोटो ट्विट करत त्यांना “हा कोणाचा फोटो?” असा सवाल विचारलाय.

मीरजमध्ये झालेल्या दंगलीत संभाजी भिडे यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. या फोटोमध्ये पोलीस भिडेंना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. तर भिडे यांचे समर्थक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, काँग्रेस नेते नितेश राणे यांनी देखील संभाजी भिडे यांना लक्ष्य केलंय. जेवढं वाईट एका बीडीला आमच्या संभाजी महाराजांचं नाव देणं, तेवढंच वाईट मनोहर भिडेला संभाजी भिडे बोलणं, असं नितेश राणे यांनी म्हटलंय.