मुंबई | अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू द्या.. पुढच्या वेळेस ते विधानसभेत येतील की नाही याची काही खात्री नाही, असा टोमणा मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना भर विधानसभेत लगावला होता. आज भाजपने तावडेंचं तिकीट कापलं आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापलं हे खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. विनोद तावडे यांना असा राजकीय धक्का मिळेल असं कधी माझ्या ध्यानी मनी देखील आलं नव्हतं, असं आव्हाड म्हणाले.
विद्यार्थीदशेपासून तावडेंनी भाजप आणि अभाविपचं काम केलं. या क्षणाला त्यांच्या परिवाराची काय भावना असेल हे मी समजू शकतो. अशी वेळ कुणावरही येऊ नये, असंही आव्हाड म्हणाले.
विनोद तावडेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधानसभा निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र तावडेंचंच तिकीट कापल्यानंतर त्यांची सोशल मीडियात एकच खिल्ली उडवली जातीये.
महत्वाच्या बातम्या-
तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणतात…- https://t.co/wC1Oudenr7 @TawdeVinod @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
रामदास आठवलेंनी छोट्या राजनच्या भावाचं तिकीट कापलं https://t.co/ogGt8F89nD @RamdasAthawale #RPI #विधानसभा2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
प्रकाश मेहतांची उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचा तूफान राडा- https://t.co/MVZBwarrRa #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.