Top News महाराष्ट्र मुंबई

अखेर मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं…

मुंबई |  एका सिव्हील इंजिनिअरला मारहण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर होत आहे. त्यावरून कालपासून बरीच चर्चा सुरू आहे. भाजपने अगदी त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र आज आव्हाडांनी मारहाण प्रकरणावर मौन सोडलं आहे.

खरं तर त्याला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळी मी माझ्या कामात व्यस्त होतो. मी मारहाण झालेल्या ठिकाणी नव्हतो. गेल्या 24 तासांपासून मी माझ्या मतदारसंघात आणि सोलापूरमधला आढावा घेण्यात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचं मला सोशल मीडियावरूनच कळलं, असं आव्हाड म्हणाले आहेत.

हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत असतो. माझ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट माझ्या अनेकदा लक्षात आणून दिली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. खरं तर तो केव्हाच गजाआड जायला हवा होता. पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संबंधित अभियंत्याच्या फेसबुकवर गेलं तर लगेच समजेल की तो संघ आणि भाजप विचारांचा आहे. त्याने अनेकदा मोठमोठ्या नेत्यांची बदनामी केली आहे. तो वारंवार वादग्रस्त पोस्ट लिहीत असतो. त्यामुळे इथून पुढची त्याची जबाबदारी भाजपने घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना राहू द्या, आधी आव्हाडांपासून वाचवा- निरंजन डावखरे

धक्कादायक! महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 150 नव्या रुग्णांची नोंद

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या