बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियंका गांधींच्या अटकेने आव्हाडांना झाली इंदिरा गांधींची आठवण, म्हणाले…

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहे. वेगवेगळ्या स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वातावरणात मात्र गरमा गरमी पाहायला मिळत आहे. या घटनेत 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनेक बड्या नेत्यांनी लखीमपूर खिरी येथे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले.

या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांचाही समावेश होता. पोलिस आणि प्रियंका गांधी यांच्यात बराच वेळ बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतलं. या सगळ्या घटना बघता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आठवणी जाग्या केल्या आहेत. लखीमपूर खिरीच्या हत्याकांडानंतर तिथे गेलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना बघून जितेंद्र आव्हाडांना ही आठवण लिहावीशी वाटली आहे.

1977च्या काळात पटना जवळच असणाऱ्या बेलछी गावात 14 दलितांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी इंदिरा गांधीही त्या गावी गेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हत्येनंतर लखीमपूर खिरीला जायला निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या काळातही इंदिरा गांधींना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण इंदिरा गांधी धिरदोस्तपणे त्यातून बाहेर पडल्या.

इतिहासाची पुनरावृत्ती होतेय, असं म्हणत आता इंदिरा गांधींची नात लखीमपूर खिरी प्रकरणाला कसं वळण देते ते बघूयात, राजकारण कधी काय वळण घेईल कोणालाच माहिती नसतं, असं बोलून जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींची ही आठवण फेसबूकवर शेअर केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

निवडणुकीत चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा महाविकास आघाडीला दणका

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, रेव्ह पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघातून धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

प्रार्थनास्थळांचे दरवाजे उघडले पण ‘या’ लोकांना प्रवेश नाहीच; काय आहे नवी नियमावली?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More