Jitendra Awhad | राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज बुधवार (29) मे दिवशी महाडच्या चवदार तळे येथे मनुस्मृतीचे दहन केलं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर आता मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाटले गेले असल्याचं स्वत: जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी चवदार तळे य़ेथे गेले आणि त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्यावेळी त्यांनी मनुस्मृतीचे दहन केलं. त्यावेळी मनुस्मृतीचे फोटो फाडत असताना त्यांनी अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
“मी महाराष्ट्राच्या जनेतेची माफी मागतो”
“आम्ही मनस्मृतीचे दहन करण्यासाठी आलो होतो. कारण ज्या मनुस्मृतीत महिलांविषयी अत्यंतं खालच्या भाषेत लिहिण्यात आलं होतं. त्या मनुस्मृतीचे जे काही श्लोक आहेत ते पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येणार असल्यास आम्ही त्याचा विरोध करत आहोत. त्यावेळी अनावधानाने माझ्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. त्यासंदर्भात मी महाराष्ट्राच्या जनेतेची माफी मागतो, असं आव्हाड म्हणाले.
“स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला”
जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे पोस्टर फाडतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील पोस्ट फाडलं त्यावर आता अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांना सुनावलं आहे. “जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी”, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत आव्हाडांवर हल्लाबोल केला.
जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. pic.twitter.com/VnQBCxwm3q
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2024
जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर गेले होते. त्यावेळी मनुस्मृतीचे फोटो फाडण्यात आले. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंडेकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. त्यावेळी त्यांनी याबाबत अवघ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे.
दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला जाणार असल्याचा सरकारने निर्णय घेतला. याविरोधात महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यापासून विरोध केला. तर त्यानंतर समता परिषदेने देखील याविरोधात आवाज उठवला.
News Title – Jitendra Awhad Say Sorry To Maharashtra State About Babasaheb Ambedkar Photo Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
जितेंद्र आव्हाडांनी चुकून फाडला बाबासाहेबांचा फोटो, राजकीय वातावरण तापलं
इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल
पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा
“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य