महाराष्ट्र मुंबई

राफेलचं प्रकरण…! आव्हाडांचं हटके अंदाजातील गाणं आणि भाजपला चिमटे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरून गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

‘सावन का महिना पवन करे शोर’ या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर जितेंद्र आव्हाडांनी गाणं लिहून भाजपला लक्ष्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी गाण्याच्या पहिल्या कडव्यात म्हटलं की… चुनाव का महिना राफेल करे शोर…पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…अनिल को तुमने देखो काँन्ट्रॅक्ट दिलाया…भारत की जनता को तुमने मुर्ख बनाया.. अब चाहे जितने मारो तुम सिक्स और फोर…पर पुरी दुनीया बोले भाई चौकीदार है चोर…

मुळ गाण्यातील शब्द बदलून आव्हाडांनी फिल्मी स्टाईलमध्ये आणि त्यांच्या हटके अंदाजात विरोधकांवर टीका केली आहे.

दरम्यान, आव्हाडांनी गिटार हातात घेऊन हे गाणं म्हणतानाचा व्हीडिओ त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर मग त्यावेळी पवारांनी मोदींवर केस का ठोकली नाही- प्रकाश आंबेडकर

-…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

-राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

-नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या