महाराष्ट्र मुंबई

“शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता, पण…”

मुंबई | शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे विश्वासघात केला होता, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

पूर्वीच्या काळात गणेश नाईक यांना राजकारणात आदराचं स्थान होतं. मात्र भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची मिळाली नाही, असं आव्हाड म्हणाले. ते नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले, असा टोला आव्हाडांनी नाईकांना लगावला आहे.

गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कुस्ती आहे. मंदा म्हात्रे या आपल्याच आहेत. गणेश नाईक आपल्यातून गेले. पण बहीण आपलीच आहे, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय.

थोडक्यात बातम्या-

“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

“आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगर आणि संभाजीनगरच राहणार’”

कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?- संदीप देशपांडे

“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या