मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. दर 10 वर्षांनी मला बाप बदलण्याची सवय नाही, अशा शब्दात आव्हाडांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. आता त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असं प्रत्युत्तर दिलं आहे
प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे, असं आव्हाड म्हणाले.
जे दुसऱ्याच्या हक्काचं आहे, ते ओरबाडून खायचं या लुटारु मानसिकतेतून नाईक कधीच बाहेर पडले नाहीत. कधी पडू शकतील याची शक्यता नाही. २५ वर्षे सत्ता हातात असून सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी नवी मुंबईसाठी काही भव्यदिव्य केलं असं एकही उदाहरण नाही. आज जी नवी मुंबई, तिच्यातल्या पायाभूत सुविधा दिसतायत, त्यातील ८५% सिडकोने उभारलेल्या आहेत हे नव्या पिढीने आधी लक्षात घ्यावं, असं नवी मुंबईकरांना आवाहान करत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीलाच मतदान करा, असं त्यांनी सूचित केलं आहे.
ट्रेडिंग बातम्या-
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; कमलनाथ सरकारच्या 22 मंत्र्यांचे राजीनामे
पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
महत्त्वाच्या बातम्या-
ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है
ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपत काय मिळणार?, हे पाच आहेत पर्याय
“मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं वाटत नाही”
Comments are closed.