बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींनी बांधलेला पुतळा बंद मात्र नेहरूंनी उभारलेली रूग्णालये 24 तास सुरू- आव्हाड

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांधलेला सगळ्यात मोठा पुतळा 31 मार्चपर्यंत बंद आहे. मात्र पंडित नेहरूंनी उभारलेली रूग्णालये संकटाच्या काळात 24 तास सुरू आहेत, असं म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणात सातत्याने नेहरूंचा उल्लेख होतो. देशातील अनेक घटनांना नेहरू कसे जबाबदार आहेत असं ते अनेक वेळा आपल्या भाषणांमधून सांगत असतात. त्याच पार्श्वभूमीवर नेहरूंना उद्देशून मोदींवर काँग्रेस समर्थकांकडून टीका करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाची परिस्थिती सांगताना नेहरूंचा दाखला देत मोदींना टोला लगावला आहे.

कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठीकेंद्र आणि राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. अनेक संस्थांना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागलं आहे.

दरम्यान, सध्या देशभरातील सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळ देखील बंद करण्यात आली आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राने कोल्हापूर पूरस्थितीवेळी पाहिलंय… आता फडणवीस अजिबात नको”

भारतात कोरोना व्हायरसनं घेतला चौथा बळी!

कोरोनामुळं शेतकरी अडचणीत; तोडणीला आलेली लिंब फेकून देण्याची आली वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More