बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनतेच्या जीवनात अंधार असताना लाईट बंद करून दिवे लावायला सांगणं हा निव्वळ मूर्खपणा”

मुंबई |  जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या दिवा लावा उपक्रमाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करून मोदींवर शरसंधान साधलं आहे.

आजच्या भाषणात मोदीजी जीवनावश्यक वस्तूंचा साठा कमी पडू देणार नाही, असं आश्वासन देतील असं वाटलं होतं.  मास्क आणि सॅनिटायझरचा साठा किंबा त्याचा काळाबाजार अजिबात होऊ देणार नाही, असं म्हणतील किंवा कोणताही गरीब उपाशी झोपणार नाही, असं देशवासियांना आश्वस्त करतील. मात्र कोरोनामुळे देशामध्ये घबराट पसरलेली असताना जनतेला धीर द्यायचा सोडून त्यांनी नवीनच इव्हेंट आणला, अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

कोरोना सारखं महाभयानक संकट आलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही त्याचा उत्सव किंवा इव्हेंट कसा बनवता, देशाला तुम्ही काय मुर्ख समजलात काय?, अशा परखड शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला आहे. तसंच जनतेच्या आरोग्याविषयी आणि सरकार करत असलेल्या उपाययोजांनाविषयी माहिती देण्याचा सल्ला आव्हाडांनी मोदींना दिला आहे.

दरम्यान, कोरोनासारख्या अंधाररूपी संकटाला दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातल्या सगळ्या लाईट बंद करा आणि घराच्या दरावाजासमोर किंवा बाल्कनीत उभा राहून 9 मिनिटे मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाईट जाळा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज सकाळी 9 वाजता त्यांनी देशवासियांना संबोधित करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा देशवासियांशी संवाद साधला.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More