“विठ्ठलाच्या नावाने दरोडा…”, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला टोला

Jitendra Awhad | विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लागलेले वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य हे वारकरी सांप्रदायाचं राज्य आहे. या वारीत लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता सर्व वारकरी एकत्र येऊन विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी आतूर असतात. अशातच आता वारीतील या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारने महाआरोग्य नावाचं शिबीर राबवलेलं दिसत आहे. मात्र यावरून आता नवीन वाद होणार असल्याची शक्यता आहे.

महाआरोग्य हे एक शिबीर नसून विठ्ठलाच्या नावाने दरोडा असल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. सरकारने महाआरोग्य शिबीरासाठी तब्बल 3 कोटींचा निधी दिला आहे. यामुळे आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी हा महाआरोग्य शिबीर असल्याचं वक्तव्य केलं आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. यामुळे हे महाआरोग्य शिबीर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदरांच्या भल्यासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या X ट्विटवर संपूर्ण लेखाजोगाच मांडला आहे. दे देते भगवान को धोका, इन्सान को क्या छोडेंगे असं लिहित त्यांनी त्या पोस्टच्या माध्यमातून चांगलंच सुनावलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं जसंच्या तसं ट्विट

विठ्ठलाच्या नावाने दरोडा दे देते भगवान को धोका इन्सान को क्या छोडेंगे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वाकऱ्यांसाठी 2 कोटी 40 लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहत. तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल होत असतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचे आय़ोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो. यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी 9 कोटी 44 लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ४० लाख रुपयांच्या औषधींचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तैनात 4 हजार ३320 मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे. जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाआरोग्य शिबिरासाठी मंडप, सीसीटीव्ही, साहित्य, वाहतूक यासाठी एकूण 9 कोटी 44 लाख रुपये खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे. तीन ठिकाणी तीन दिवसांसाठी हे आरोग्य शिबिर होणार आहे. तेथे वारकऱ्यांना मोफत उपचार व औषधी पुरविली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला राज्य सरकारचे अवर सचिव अ. भि. मोरे यांनी मंजुरी दिली आहे. यात एकूण खर्च 9 कोटी 40 होणार असून, वारकऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ 2 कोटी 40 लाखांची औषधी येणार आहेत. उर्वरित 7 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जेवनावर होणार 3 कोटींचा खर्च महाआरोग्य शिबिर तीन ठिकाणी होणार असून, ते तीन दिवस असते. त्यापैकी पहिले महाआरोग्य शिबिर वाखरीत, दुसरे तीन रस्ता आणि तिसरे गोपाळपूर येथे असेल. यासाठी आरोग्य विभागाकडून विशेषज्ञ डॉक्टर, फिजिशियन, फार्मासिस्ट, असे मिळून प्रत्येक शिबिरासाठी 11440 आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या तीन दिवसांच्या खानपानासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे औषधे 2 कोटी 40 लाखांची आणि खानपान 3 कोटींचा.

महाआरोग्य शिबिराचे अंदाजित खर्च :

मंडप – 90 लाख

बैठक व्यवस्था, फर्निचर, खुर्ची – 12 लाख

स्वच्छतागृह व्यवस्था – 15 लाख डॉक्टर, नर्सेस अल्पोपहार, भोजन खर्च – 3 कोटी

जागा भाडे खर्च – 6 लाख

सीसीटीव्ही, डिजिटल स्क्रीन – 15 लाख

निवास व्यवस्था – 1 कोटी 80 लाख

उपचार केंद्रांचा खर्च – 20 लाख

आकस्मिक खर्च, केसपेपर, इंटरनेट

वॉकीटॉकी – 35 लाख वीज कनेक्शन

वीज बिल – 6 लाख वाहतूक व्यवस्था

इंधन खर्च – 10 लाख आरोग्य दूत इंधन खर्च – 10 लाख

औषध व औषधी साहित्य सामग्री – 2 काेटी 40 लाख एकूण खर्च – 9 कोटी 44 लाख.

News Title – Jitendra Awhad Slam To State Government About Maha Aarogya Shibir About Lord Vitthal Devotee

महत्त्वाच्या बातम्या

‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, या खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

पोलीस भरती पुढे ढकला; ‘या’ नवनिर्वाचित खासदाराची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आज बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये

उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?

या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो