कृष्णा आंधळेचं काय झालं?, धक्कादायक माहिती समोर

Krushna Andhale

Krushna Andhale | राज्यात खळबळ उडवणाऱ्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने सातत्याने त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. “या कुटुंबाला न्याय द्या!” – जितेंद्र आव्हाड आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “मी आधीच्या भाषणांमध्ये हे सर्व सांगितलं होतं. जेव्हा संतोष देशमुख अंतिम घटका मोजत होते, तेव्हा त्यांच्यावर नराधम, जल्लाद लघुशंका करत होते. पण त्यावेळी लोकांनी आमची टिंगल केली.” तसेच, “राज्यात माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा कुठून आला? आपल्याकडे बहीण, बाप, भाऊ, मुलं आहेत. राज्यातील जनतेलाही या घटनेने हादरवून टाकले आहे.”

आव्हाड यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, “जेव्हा गुन्हे केल्यानंतर आरोपींना राजकीय पाठबळ मिळतं, तेव्हा त्यांना काहीच होणार नाही, अशी भीती नाहीशी होते. मग असले क्रूर प्रकार घडतात. जर यांना शिक्षा झाली नाही, तर पुढे आणखी असे प्रकार घडतील.” तसेच, “संतोष देशमुख यांचे हे फोटो जेव्हा त्यांची मुलं बघतील, त्यांना काय वाटेल? हे फोटो त्यांच्या डोळ्यासमोरून जाईल असं वाटतं का?” असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आव्हाड यांनी पुढे जाऊन अन्य प्रकरणांवरही भाष्य करत, “महादेव मुंडे, किशोर फड, बापू अंधारे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. तसेच, कृष्णा आंधळे हा जिवंत नाही, त्याची हत्या झाली आहे,” असे मोठे विधान केले.

Krushna Andhale | धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल आहे. तसेच, न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझी प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.”

राजीनामा दबावामुळे की नैतिकतेमुळे?

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यांनी हे वैद्यकीय कारणास्तव घेतलेला निर्णय असल्याचे सांगितले आहे. मात्र, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते हा राजीनामा जनतेच्या दबावामुळे घ्यावा लागला, असा आरोप करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील न्यायालयीन तपास आणि पुढील राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .