जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाले…
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी मुंबईत उत्तर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला आव्हाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नागाने फणा काढावा असा त्यांचा चेहरा आहे. उद्या परत काहीतरी बोललो तर डसतो की काय असं वाटतं. मनसे (MNS) संपलेला पक्ष म्हणे, ये शेपटी पकडून फेकून देतो, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी आव्हाडांवर केली होती. राज ठाकरेंच्या या टीकेचा आव्हाडांनी खरपूस समाचार घेतला आहे.
माझा चेहरा नागाच्या फणासारखा आहे, याची त्यांनी नक्कल करून दाखवली. माझा चेहरा नागासारखा आहे त्याचा मला अभिमान आहे. पण त्यांचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे राज ठाकरेंनी आरशात तपासून घ्यावं, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे उत्तम नकलाकार आहेत. इथं स्टँडअप कॉमेडियनच्या जागा खूप खाली आहेत. त्यांनी त्याचा उपयोग करावा, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNGच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ
मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, रूग्णालयात दाखल
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज
“3 तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…”; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम
“हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार”, राज ठाकरे कडाडले
Comments are closed.