बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना…; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

मुंबई | नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यातच त्यांनी क्रुझ ड्रग्ज प्रकरणात केलेल्या खुलास्यांमुळे आणि आरोपांमुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली होती. याच प्रकरणात नवाब मलिकांवर टीका होत असताना आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आणि भाजपला नाव न घेता टोला लगावणारं ट्विट केलं आहे.

‘नवाब मलिक हे उर्दूतही नाव लिहितात आणि त्यामुळे भक्तांना पोटशुळ उठलाय’, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी भाजपचं नाव न घेता टोला लगावला आहे. आज सकाळी त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच उर्दू भाषेचा मुद्दा समोर आल्याने आता नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

उर्दूही 100 टक्के भारतीय भाषा आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ठामपणे सांगत महाराज रणजीत सिंह यांच्या दरबारी उर्दू भाषा वापरत होते, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर कृष्णचंद्र, राजेंद्रसिंग बेदी, कन्हैयालाल कपूर अशा हिंदूंनी त्या भाषेत अप्रतिम साहित्य निर्माण केलं आहे, हे कुणीतरी त्या भक्तांना सांगा, असं देखील आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आव्हाडांच्या ट्विटनंतर आता विरोधी पक्षाकडून त्याला कसं प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना विविध कारणांसाठी वेग आल्याचं दिसून येत आहे. त्यातच जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटमुळे चर्चेत आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

अरविंद केजरीवाल पंजाबमधील महिलांना दरमहा देणार 1000 रुपये

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More