“अफजल खान, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं आहे. अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल, असं जितेंद्र आव्हाड ( Mla Jitendra Awhad) म्हणालेत.

त्यांनी पुरावा दिला ना, जिना यांनी पाकिस्तान काढला आणि यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानात नाही येणार हा आमचा देश आहे. त्यांना कसले कागदी पुरावे मागत आहेत? त्यांनी पुरावा दिला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवार छत्रपती संभाजी राजेंना काय म्हणाले? यावर महाराष्ट्र पेटला आणि मग आम्हाला सांगावं लागलं की दादोजी कोंडदेव महाराजांचा गुरू नव्हता, असा दावा आव्हाडांनी केलाय.

Francis Martin याने संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीतरी लिहून ठेवलंय. मला नवा वाद उकरून काढायचा नाही म्हणून इथेच थांबतो, असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, हे व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालं आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचं काम काही लोक करत आहेत. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद आहे, असंही आव्हाड म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More