Aurangzeb controversy | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील औरंगजेबाच्या कबरीच्या (Aurangzeb controversy) मुद्यावरून राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar Faction) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
“औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हिरो झाले,” असे ते म्हणाले, त्यामुळे राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं?
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा वेगळा मुद्दा आहे. एकदाची ती कबर उखडा, दररोज तेच तेच बोललं जातंय. हजारो विषय प्रलंबित असताना केवळ औरंगजेबावरच बोललं जातंय. इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले.”
या वक्तव्यानंतर भाजप (BJP) आणि महायुतीतील इतर पक्षांकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. तसेच, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांनी यापूर्वीच औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत, अन्यथा बाबरीप्रमाणे इतिहास घडेल, असा इशारा दिला आहे.
“इतिहास बदलता येत नाही, सरकारचा छुपा पाठिंबा”
या वादावर याआधीही जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका करत म्हटले होते की, “यांना महाराष्ट्र जाळायचा आहे, त्यामुळे हे सर्व घडवले जात आहे. रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का? अफजल खानला वगळून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का? हिटलरला बाजूला करून दुसरे महायुद्ध समजावता येईल का?” असे प्रश्न उपस्थित करत, सरकारवर इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, सरकारला या गोष्टींचा छुपा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.
Title : Jitendra Awhad Statement on Aurangzeb controversy