महाराष्ट्र मुंबई

राम कोणाच्या मालकीचा नाही; आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.

राम कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरेंची श्रद्धा रामावर असेल तर त्यात गैर काय आहे?, त्याचा सरकारशी काय संबंध?, असे प्रश्न विचारत आव्हाडांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

राम ही श्रद्धा आहे. मी खंडोबा, कोलकातामधील दुर्गामातेच्या मंदिरात जातो. तुळजापूर, सप्तशृंगीला जातो. देव हा एकच आहे. त्यामुळे ते रामाकडे गेले तर काय फरक पडतो, असंही आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, मला वाटत नाही की यामध्ये काय राजकारण करण्यासारखं आहे. ज्याला रामाच्या नावावरुन राजकारण करायचं त्यांचे हे धंदे आहेत. आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या