बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसतीये. वाढत्या कोरोना रूग्णांमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडं वारंवार ऑक्सिजनसाठी विनंती केली जात आहे. आता या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.

महाराष्ट्राच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की आपण राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा. सध्या जगण्यासाठीची ती गरज झाली आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. आता या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरूनही आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरूवात होणार असं दिसतंय.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आधी ट्विट करून आणि नंतर माध्यमांसमोर येऊन हा आरोप केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”

“भन्नाटच… मला मैदानात असे 11 जडेजा पाहिजेत”

कोरोना ही बिल गेट्सची कल्पना, तो व्हायरस नसून दहशत- बंडातात्या कराडकर

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More