महाराष्ट्र मुंबई

‘माझा फोन टॅप होतोय…’; जितेंद्र आव्हाडांच्या त्या ट्वीटनं खळबळ

Photo Credit- Facebook/ Jitendra Awhad

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटतं असल्याचं म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री एक ट्वीट केलं आहे. माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे, अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

यापूर्वी संजय राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगविरोधात गंभीर आरोप केले बोते. तसंच त्यांनी एका मंत्र्याचं नाव घेत त्यांचा फोन टॅप होत असल्याचं म्हटलं होतं.

भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आले होते.

थोडक्यात बातम्या-

“भारताच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार”

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर…- गुलाबराव पाटील

सावधान!! कोरोनासंदर्भात अफवा पसरवाल तर… प्रशासनानं नागरिकांना दिला इशारा!

मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही तर…- दत्तात्रय भरणे

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या