पुणे महाराष्ट्र

होय, शरद पवार हे जाणता राजा आहेत; आव्हाडांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर

पुणे | जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं म्हणत भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यालाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

होय, शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Loading...

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी असे किती प्रकल्प सांगू…त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

 

Loading...

ताज्या बातम्या