महाराष्ट्र मुंबई

“अभि नही तो कभी नही… उद्धवजी लॉकडाउनने भागेल असं वाटत नाही आता…”

मुंबई | उद्धवजी तुमच्या कामाची प्रशंसा होत आहे मात्र लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही त्यामुळे आता लॉक डाउनने भागेल असं वाटत नाही संचार बंदी लागू करा, असं राष्ट्रवादीचे  नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 89 झाली आहे. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही, असं म्हणत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना संचारबंदीची मागणी केली आहे.

आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये स्त्यांवरील वाहतुकीचे गर्दी असेलले फोटो शेअर केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रातील नागरी भागात 144 कलम लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो; ट्रम्प चीनवर संतापले

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

महत्वाच्या बातम्या-

लगेच सेलिब्रेशन सुरु करु नका; नरेंद्र मोदींनी जनतेला खडसावलं

‘हे अपेक्षित नाही…’, रस्त्यावर उतरुन घंटानाद करणाऱ्यांवर अजित पवार संतापले

कोरोना नियंत्रणासाठी न्यायालयांचा पुढाकार; न्यायाधीशांनी दिला महिन्याचा पगार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या