बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांना कोणत्या व्याधीनं पछाडलंय माहित नाही”

मुंबई | काही ठराविक मोहल्ल्यांमध्ये कोरोनाग्रस्ता्ची संख्या दिवसेंदिवस हळूहळू वाढतच चालली आहे. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे लॉकडाउन पाळला जात नाही. मुंब्रा कळवा सारख्या भागात लॉकडाउन पाळला गेला पाहिजे, याबद्दल जितेंद्र आव्हाड बोलत नाही, असा आरोप फडणवीसांनी केला होता. यावर  जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत आव्हाड बोलत होते.

फडणवीसांना  ज्या मोहल्ल्यांचा उल्लेख करायचा होता. त्या मोहल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोनच रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवानं मला माहिती नाही, देवेंद्रजींना कोणत्या व्याधीनं पछाडलंय. पण, सागर बंगल्यात बसून, धृतराष्ट्राला संजय जशा बातम्या देत होता. तसं धृतराष्ट्र बनण्याचा प्रयत्न देवेंद्रजी करत आहेत, अतिशय दुर्दैवाची बाब असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र बंद पडला होता तेव्हा निम्म्या डॉक्टरांनी रुग्णांना तपासण सोडून दिलं. तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आवाहन केलं की डॉक्टरांनी बाहेर पडायला पाहिजे. तेव्हा कळव्यामध्ये 12 कम्युनिटी क्लिनिक सुरू झाले. मुंब्रामध्ये एक करोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणार एक रुग्णालय आणि क्लिनिक सुरू झालं असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं.

दरम्यान, आव्हाडांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

महत्वाच्या बातम्या-

अमेरिका ही मदत कधीच विसरणार नाही; ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट; आला हा रिपोर्ट

राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More