मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. पण यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांचा साधा उल्लेखही केला नाही. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं.
साबरमतीचा आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो त्या महात्मा गांधीजींचा ट्रम्प यांनी साधा उल्लेखही केला नाही. ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुदैवी बाब आहे. ट्रम्प यांची मी निंदा करतो, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या समस्त गांधीप्रेमींची माफी मागितली पाहिजे. गांधीभूमीत येऊन त्यांनी गांधींचं नावही घेतलं नाही यामुळे गांधी विचारांचा अपमान झाला आहे. आम्ही ट्रम्प यांची यासाठी निंदा करतो, असंही यांनी आव्हाड म्हटलं आहे.
दरम्यान, ट्रेम्प यांनी गांधीजींचं नाव न घेतल्यामुळे काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष #DonalTrump यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु, हा आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुदैवी बाब आहे. ट्रम्प यांची मी निंदा करतो.
– @Awhadspeaks pic.twitter.com/WlCmDEyLKo— NCP (@NCPspeaks) February 24, 2020
ट्रेंडिंग बातम्या
…म्हणून डोनाल्ड ट्रम्प दारु आणि सिगारेटला हात लावत नाहीत!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जमाफीचा दुसरा टप्पाही लवकरच जाहीर करतील- बच्चू कडू
महत्वाच्या बातम्या-
शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर, पहिल्या यादीत 15 हजार नावं
इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्याचं भूषण आहेत- सुजय विखे
मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.