बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे पॅट कमिन्सने दाखवून दिलं- जितेंद्र आव्हाड

मुंबई | कोरोनाची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर गंभीर होत चालली आहे.त्यात आता ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच परिस्थितीचं गांभीर्य ठेवत आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघचा गोलंदाज पॅट कमिन्सने पुुढाकार घेत मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या मदतीमुळे त्याचं कौतुक होत आहे.

कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कमिन्सचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

ॲास्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्सने भारताला ॲाक्सिजनसाठी 50 हजार डॅार्लसची मदत केली. त्याबद्दल त्याचे मनापासून आभार पण पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे त्यानं दाखवून दिलं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएल ही जगातील सर्वात प्रसिद्ध लीग आहे. यामध्ये अनेक परदेशी खेळाडू भाग घेतात. त्यासोबतच आपले भारतीय क्रिकेटपटूही यामध्ये खेळत असतात. खेळाडूंना या लीगमध्ये करोडोमध्ये बोली लावली जाते. मात्र अशा प्रकारे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कमिन्सने केलेल्या मदतीने भारतीयांच्या मनात त्याने वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. त्यासोबतच त्याचा संघ सहकारी शेल्डन जॅक्सननेही गौतम गंभीर फाऊंडेशनला आर्थिक मदत केली आहे. मात्र त्याने आपण दान केलेली रक्कम ही जाहीर केली नाही.

 

थोडक्यात बातम्या- 

दिलदार ‘केकेआर’! पॅट कमिन्सनंतर केकेआरच्या आणखी एका खेळाडूने केली मदत

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊसाची शक्यता, हवामानाचा खात्याचा शेतकऱ्यांना अलर्ट!

ज्युलिओ रिबेरोंच्या टिप्पणीवर फडणवीसांचं ओपन लेटर; म्हणाले, “माझ्या हातून….”

गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने धडपड करणाऱ्या डाॅक्टरांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More