बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांनी राज्यात नवीन धोरण जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि राज्याचा विकास करण्यासाठी  लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू करणार असल्याचं सांगितलं. मात्र यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगींवर निशाणा साधला आहे.

13 टक्के मुस्लिमांना दोनपेक्षा जास्त मुलं असतील तर 83 टक्के हिंदूंना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत. लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भिती दाखवून अतुलचं म्हातारपण कष्टप्रय करण्याचा डाव असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आव्हाडांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

स्वत:ला चार मुलं असलेले भाजपचे गोरखपूरचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार. ज्येष्ठ विचारवंत एडवर्ड ल्यूस म्हणतो, गरिबी माणसाला जास्त मुलं जन्माला घालायला भाग पाडते. ती त्याच्या उतारवयाची गुंतवणूक असते, असंही जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकारी नोकरी आणि सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित ठेवलं जावं. दोन अपत्यांच्या धोरणाचे पालन न करणाऱ्यांना सर्व भत्त्यांपासून वंचित ठेवलं जावं. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढता येणार नाही. शिवाय सरकारी नोकरीसाठी अर्ज देखील करता येणार नाही आणि बढती देखील मिळणार नसल्याचं लोकसंख्या नियंत्रण विधेयकाच्या मसुद्यात म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर

मी एक अमेरिकन नागरिक असलो तरी माझ्या मनात भारतच- सुंदर पिचाई

राजकीय नाटकं चालतात पण आमची रंगभूमीवरची नाही- केदार शिंदे

“मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More