बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजीव हे तुझं जाण्याचं वय नव्हतं!; जितेंद्र आव्हाड यांची अत्यंत भावनिक पोस्ट

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. सातव यांच्या अकाली जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय क्षेतातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टद्वारे दु:ख व्यक्त केलं आहे.

माझ्या जिवाभावाचा व माझ्या सामाजिक विचारांना नेहमीच साथ देणारा हसतमुख राजीव सातव आज एकटा निघून गेला. राजीव सातव आणि माझी मैत्री ही जवळ-जवळ 20 वर्षे जुनी होती. नेहमी हसतमुख चेहरा… राजीव सातव कोणावर चिडलायं असं मी कधीच बघितलं नसल्याचं जितेंद्र आव्हाड  यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एक गोष्ट त्याची मला कायम आठवणीत राहील. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जरा काही तणाव निर्माण झाला की, राजीव खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे 5-50 फोन यायचे. तो मला बोलवताना कधी ‘दादा’ बोलायचा तर कधी ‘बॉस’ बोलायचा, असं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, राजीवचा फोन आला की, त्याचं सुरु व्हायचं. दादा बघ ताईंशी बोलून घे, साहेबांशी बोलून घे मी राहुलजींशी बोलतो काही होणार नाही ना… टिकलं पाहिजे… टिकलं पाहिजे… कसही करुन टिकलं पाहिजे, अशी आठवण आव्हाडांनी सांगितली.

थोडक्यात बातम्या- 

रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली, पोलिसांनी बघितलं तर अत्यंत धक्कादायक प्रकार उघड

राजीव सातव यांच्याबद्दल बोलताना महाराष्ट्रातील ‘हा’ नेता ढसाढसा रडला

फेसबुकवरुन केलं तरुणीला प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याचं सांगून 25 मित्रांकडून गँगरेप

“राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला”

कोरोना रुग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढणं आलं अंगलट, आता सारं गाव भोगतंय सजा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More