मुंबई | सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं एम्सने आपल्या अहवालात सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुशांतच्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना सवाल केला आहे.
सीबीआयेनेही मान्य केलं आहे की सुशांतने आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रा आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली असल्याचंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स,मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली.आता CBIने मान्य केलं आहे की,सुशांतने आत्महत्याच केलीय.महाराष्ट्रा आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?#MahaPoliceMyPride
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ डॉक्टरांचा मृत्यू
“आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?”
“हे तर मुंबईला बदनाम करण्याचं कटकारस्थान होतं, खोट्यांचं पितळ उघडं पडलं आहे”
कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे ‘खेती बचाओ’ अभियान; राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार