बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार म्हणाले आणि आम्ही विरोधी बाकांवर बसलो’, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ आठवण

मुंबई | महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आता महाविकास आघा़डीतील घटक पक्ष शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) आणि काँग्रेस (INC) पक्ष आता विरोधी बाकांवर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यात मोठी बदनामी झाली. कारण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आम्हाला निधी देत नाहीत, अशी कारणे सांगितली. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अनेक टीकांना सामोरे जावे लागत आहे.

असाच एक प्रसंग 1995 साली घडला होता. त्यावेळीची एक आठवण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) सांगितली. आव्हाड म्हणाले, 1995 साली पहिल्यांदाच युती सरकार आले. म्हणजे महाराष्ट्रात पहिले विनाकाँग्रेस सरकार आले. तेव्हा शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. ते वर्षा बंगल्यावर रहात होते. जसजसे निकाल येत गेले तसतसे वर्षा बंगल्यावर उपस्थित नेत्यांना कळाले की, आता काँग्रेस बहुमतात येत नाही.

दुसऱ्या दिवशी मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत पवारांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेलेले सर्व ज्येष्ठ नेते पवारांना आग्रह करीत होते की, आपण सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकतो. तेव्हा पवार म्हणाले, जनमत आपल्या विरोधात आहे. असे सरकार बनविणे योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकांवर बसायला हवे.

दरम्यान, हा निर्णय आणि ते वाक्य सर्वस्वी पवारांचे आहे. दिल्लीचा किंवा हायकमांडचा त्यात काही संबंध नव्हता. मी या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. शरद पवारांची राजकीय जीवनातील 60% वर्षे ही विरोधी बाकावर बसण्यात गेली. शरद पवार 1968 ला पहिल्यांदा निवडून आले, तेव्हापासून ते विधीमंडळाचे किंवा संसदेचे सदस्य आहेत, असे यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर

‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ -दीपाली सय्यद

‘संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त…’; राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

पुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार, पोस्टर पाहून चाहते भावूक

प्रतिक्षा संपली, रणबीर-आलियाचं ‘केसरीया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More