महाराष्ट्र मुंबई

‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर असलेलं प्रेम संपुर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी पुढचा 1 महिना शरद पवारांनी गेल्या 50 वर्षांत केलेली कामं एका खास सिरीजच्या माध्यमातून सांगणार असल्याची घोषणा केली आहे.

आषाढी एकादशीच निमित्त साधत जितेंद्र आव्हाडांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. साहेबांबद्दल समज गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केलं असल्याचं आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागच्या 50 वर्षात जे प्रचंड काम साहेबांनी या देशासाठी,राज्यासाठी,राज्यातील महिलांसाठी केले आहे,ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचं कधी मार्केटिंग केलं नाही.आजच्या अंबाणीच्या सेल्समनसारखा काहीच न करता नुसती जाहिरातबाजी साहेबांनी केली नाही. साहेब ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आपलं काम,आपलं कर्तव्य आणि देशसेवा समजून केलं होत आणि करत आहेत, असं आव्हाड म्हणाले आहेत.

थोडंस जाणून घेऊयात आपण शरद पवारांविषयी आणि त्यांच्या अवाढव्य कामाविषयी. आजपासून 1 महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू. जमली तर नक्की वाचा. टीका तर नेहमीच करता आपण .यावेळी त्यांना थोडं जाणून घ्या.तु मच्या मतात नक्की फरक पडेल हा विश्वास आहे, असं आव्हाड यांनी म्हटलंय. 

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, आव्हाडांचा मोदींवर निशाणा

वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार

कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या