बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्री असावा तर असा! जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

मुंबई | कॅन्सर आजारावर उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रूग्णालय प्रसिद्ध आहे. राज्यातूनच नाहीतर देशातून अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासोबत जे नातेवाईक येतात त्यांची मात्र परवड होताना दिसते. कारण त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांना फुटपाथवर रात्र काढावी लागते. पण आता तशी काही वेळ येणार नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आव्हाडांनी आज घोषणा केली आहे.

म्हाडामार्फत टाटा मेमोरियल येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी, ती कमी करण्याच्या दृष्टीकोनातून म्हाडा माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुढे आली आहे. म्हणूनच टाटा मेमोरियल हॉस्पिटल पासूनच फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या हाजी कासम चाळ येथे 100 फ्लॅट्स म्हाडा तर्फे देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

कोणताही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी होवू नये म्हणून या फ्लॅट्सचा ताबा आम्ही पूर्णपणे टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे सोपवत आहोत.म्हणूनच या फ्लॅट्सचा ताबा दिल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी देखील टाटा मेमोरियल ट्रस्टकडे असणार असल्याचं आव्हाड म्हणाले.

दरम्यान, माझी आई देखील कॅन्सरची बळी ठरली होती. तिच्या उपचारासाठी खूप धावपळ करावी लागली होती. आज तिची प्रकर्षाने आठवण येत आहे. म्हणूनच मला अस वाटत की, कॅन्सर झालेल्या व्यक्तीचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे दुःख मी समजू शकतो. गोरगरीब जनतेला या निर्णयाच फायदा व्हावा, आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत, एवढीच माझी इच्छा असल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले

‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात

…अन् पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस

पूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More