Top News विधानसभा निवडणूक 2019

शिवसेना-राष्ट्रवादीचे सूर जुळले; याप्रकरणी आव्हाडांचं सेनेला समर्थन अन् खुला पाठिंबा!

मुंबई |  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या म्हणणाऱ्या शिवसेनेने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे. याच बदललेल्या शिवसेनेचं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलं आहे आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरात बोलताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यिक आणि सामाजिक योगदान अधोरेखित केलं आणि सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांचा यथोचित गौरव करावा, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांना भारतरत्न द्यावं ह्या शिवसेनेच्या मागणीला खुले आणि मनापासून समर्थन… असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. दुसरीकडे शिवसेना ही जहाल हिंदुत्ववादी संघटना म्हणू  ओळखले जाते. त्यामुळे शिवसेनेने ही मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, अण्णाभाऊंना भारतरत्न द्या, अशी मागणी अनेक वर्षांपासून काही दलित संघटना करत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या