बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

मुंबई | मुलीचा विवाह म्हटलं की, वडिलांच्या मागे अनेक जबाबदाऱ्या असतात. मुलीचं लग्न उत्साहात, थाटामाटात करण्याचा वडिलांचा प्रयत्न असतो. मात्र, हे सर्व करत असताना अवाजवी खर्चाचा बोजा सहन करावा लागतो. त्यातच पाहुण्यांची रूसवा फुगवी इतका उपद्व्याप होतो. या सर्वांवर उपाय म्हणून विवाह सोहळा साध्या पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची एकूलती एक कन्या नताशाचा (Natasha) विवाह सोहळा (Wedding ceremony) अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला आहे.

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांची लग्न होत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह रजिस्टर पद्धतीने विवाह करत एक आदर्श निर्माण केला आहे. मुलीला निरोप द्यावयाचा असल्याने  जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ’25 वर्षे आपल्या अंगाखाद्यांवर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खुप वेदनादायी आहे’, हे सांगताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

‘एका बापाने अशावेळी काय बोलायचं? कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही. कारण घरात दिसणारी बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार, घरातील घरपण गेल्यासारख असेल’, अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत जा मुली जा…दिल्या घरी तू सुखी रहा …..!, असं म्हटलं आहे. त्याबरोबरच हा अस्वस्थ क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  रजिस्टर पद्धतीने विवाह, अत्यंत साधेपणा, कोणताही बडेजाव नाहीसर्वांनी अनुकरण करावा असा मार्गदर्शनीय विवाह सोहळा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंच्या भेटीला; समोर आलं ‘हे’ कारण

omicron हवेतून पसरतोय?; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

‘…हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल’; आनंद महिंद्रांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More