बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 24 तासांत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर; काढला हा तोडगा

मुंबई | राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. यानंतर जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर तोडगा काढत 24 तासांत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर केल्याचं कळतंय.

कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सोयीसाठी बॉम्बे डाइंगमध्ये 100 सदनिका आरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

दरम्यान, ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी घरे काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या मेलेल्या आईची शप्पत घेतो मी त्यातला माणूस नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू!

“विरोधी पक्ष नक्की कोठे आहे?, पवारांनी फक्त आस्वाद घेण्याचं काम केलं”

कोरोनावर तयार होणार ‘सुपरव्हॅक्सिन’; सर्व व्हेरिंएटचा नायनाट करणार

जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More