बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दलालांनो… मंगळसूत्र, शेती गहाण ठेवून दिलेले पैसे घेऊन तुमची मुलं सुखी होणार नाही”

मुंबई | गत काही महिन्यांपासून राज्य सरकारच्या (State Government) विविध नोकर भरतीमध्ये (Recruitment) घोटाळे (Scams) असल्याचं आता उघड व्हायला लागलं आहे. आरोग्य भरतीचा (Health Department) तर गोंधळ तर उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. अशातच आता म्हाडाच्या (MHADA) भरतीत नोकरी लावतो म्हणून काही दलाल घुसल्याचं समोर आलं आहे. याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Mnister JItendra Awhad) यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांना आणि दलालांना दोघांनाही संदेश दिला आहे. म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत, असं आव्हाड म्हणाले आहेत.

माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. राज्यात एखाद्या मंत्र्यांनी त्यांच्याच खात्यात चालू असलेल्या गोंधळाबाबत पोस्ट केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे.

दरम्यान, सध्या राज्य सरकारतर्फे आरोग्य भरतीतील आरोपींना पकडण्यात येत आहे. अशातच आता म्हाडाच्या परिक्षेत असा प्रकार समोर आल्यानं विद्यर्थ्यांमध्ये चिंता पसरली आहे.

थोडक्यात बातम्या 

“पुढच्या आठवड्यात एका भाजप नेत्याला अटक होणार”

“मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी देण्यात येणार”

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”

“किरीट सोमय्या यांना ईडीचा अधिकृत प्रवक्ता घोषित करावं”

मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर…- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More