बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, असे धंदे मी करत नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई | टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी घरे काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या मेलेल्या आईची शप्पत घेतो मी त्यातला माणूस नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहेत. स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज सांगितलं, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

माझी आई देखील 27 दिवसांत कॅन्सरने वारली आहे. असे धंदे मी करत नाही. मी कोणाची घरं काढून घेतली नाही. जे अधिकचे गाळे वाटण्यात आले त्यांच्यावर म्हाडाचा अधिकार होता. ती वाटण्यात आली आहेत, असं आव्हाडांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

मंत्री बच्चू कडूंनी वेशांतर करुन टाकलेल्या धाडीमुळे धक्कादायक माहिती समोर!

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

“शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More