विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची भाजपमध्ये एंट्री

Politics l महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा देखील सुपूर्द केला आहे. जितेश अंतापूरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसला मोठा धक्का :

जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. अंतापूरकरांच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे काँग्रेस पक्षाने यापूर्वीच जीशान सिद्दीकी आणि अंतापूरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी हा काही धक्का नसल्याचे नाना पटोले यांनी बोलून दाखवले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणुकीत देगलूरमधून जितेश अंतापूरकर विजयी झाले होते. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक जिंकली होती. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी खूप काम केल्याचे बोलले जाते. अंतापूरकरांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि समाजकल्याण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते.

Politics l भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश अंतापूरकर कोण आहेत? :

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा देखील समावेश होता. त्यामुळे त्यांची काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये दाखल झालेल्या जितेश अंतापूरकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे जितेश अंतापूरकर यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडनही केले होते.

मात्र अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून अंतापूरकर भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. महत्वाचं म्हणजे जितेश अंतापूरकर यांचे वडील रावसाहेब 2019 साली विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते, मात्र 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मुलगा जितेश अंतापूरकर विजयी झाले होते.

News Title- Jitesh Antapurkar Joins BJP

महत्त्वाच्या बातम्या –

चुकीच्या तेलाने बिघडू शकते आरोग्य, मग स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?

“कंगना संसदेत बसायच्या लायकीची नाही, तिने..”; कुणी केली जहरी टीका?

सतर्क! वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

गणेशोत्सवात ‘या’ नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे घ्या दर्शन, सर्व संकटे होतील दूर

महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा!