संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना काय आरक्षण देणार?- जितेंद्र आव्हाड

ठाणे | आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ज्या सरकारमधील मंडळींचा संविधानालाच वैचारिक विरोध आहे ते मराठ्यांना आरक्षण काय देणार?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार, आहे, असं ते म्हणाले

विकासाच्या, प्रगतीच्या मुद्द्यावर आपल्याला मतं मिळणार नाही हे पंतप्रधानांना कळून चुकलंय, तेव्हा मग यांना रामाची आठवण झाली, मंदिर वही बनाऐंगे पर तारीख नही बतायेंगे, 2019ची निवडणूक जवळ येतेय, ना म्हणून लोकांना भावनिक केलं जातं आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी

-आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश