Top News शिक्षण

जो बायडन यांनी फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसात घेतली सभा

फ्लोरिडा | गेल्या वर्षीच्या निवडणुकीत साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा फार गाजली होती. आता अशीच एक सभा अमेरिकेतही घेतली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार जो बायडन यांनी घेतलेली पावसातील सभा सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी चांगलाच जोर लावलाय. नुकतंच या दोघांचाही फ्लोरिडामध्ये सभा झाल्या.

यावेळी बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं. बायडन यांच्या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

बायडन यांनी देखील त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून सभेतील फोटो ट्विट केलाय. शिवाय ‘हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल,’ असं कॅप्शनही त्यांनी फोटोला दिलंय.

महत्वाच्या बातम्या-

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?- विजय वडेट्टीवार

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या तीन युवा नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या