जो जिता वही सिकंदर, सिकंदरच्या खेळीनं भूपेंद्रसिंहला दाखवलं आसमान

मुंबई | नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती(Maharashtra Kesari) स्पर्धा पार पाडली. यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान शिवराज राक्षेनं(Shivraj Rakshe) पटकावला. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला खरं पण सिंकदर शेखच्या(Sikander Sheikh) पराभवाचीच जास्त चर्चा रंगली होती.

आता सिंकदर शेख पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण पराभवामुळं नाही तर जिंकल्यामुळं. नुकतीच भिमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ मोहळ तालुक्यात भीमा सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर कुस्तीची स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत त्याची शेवटची फेरी पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला याच्यासोबत झाली. अवघ्या सात मिनिटांत सिकंदरनं भूपेंद्रसिंहला पराभूत केलं आणि भिमा केसरीचा किताब आपल्या नावावर केला.

भिमा केसरीचा मानकरी ठरलेल्या सिकंदरला भिमा केसरी किताब, रोख रक्कम आणि चांदीची गदा मिळाली आहे. सध्या त्याच्या या जलव्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याच्यावर अन्याय झाला आहे, असं म्हणत अनेकांनी आमच्यासाठी खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे, असं मत व्यक्त केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More