बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

नवी दिल्ली | देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहीचे उद्योगधंदे बंद झाले. सरकारी नोकऱ्या देखील कमी झाल्या आहेत. तर काही सरकारी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता आरबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी तरूणांंना मिळाली आहे.

रिझर्व बँकेने ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती प्रक्रिया सूरु केली आहे. या अंतर्गत देशाच्या विविध भागात ही भरती प्रकिया केली जाणार आहे. या पदासाठी वेतन 10,940 पासून 23,700 रूपये प्रतिमाह इतका दिला जाणार आहे. यासह इतर मासिक भत्ते देखील यात भेटणार आहेत. या भरतीच्या अर्जासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

या भरतीसाठी 18 ते 25 वयोगटातील तरूण-तरूणी पात्र असतील. तर आरक्षित गटासाठी कमाल वयोमर्यादेत सवलत दिली आहे. या भरती अर्जात खु्ल्या गटासाठी शुल्क 450 रूपये असेल. तर एससी आणि एसटी वर्गासाठी 50 रूपये शुल्क आकारले जाईल. हा अर्ज rbi.org.in या वेबसाईटवर भरता येणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या शहरात पद भरत्या होत आहेत. मुंबईत 202 पदासाठी तर नागपुरात 55 पदासाठी भरती काढण्यात आली आहे. अशा विविध शहरांमध्ये 841 पदांसाठी ही भरती होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

अन् भर विधानसभेत ‘या’ काँग्रेस आमदारानं काढला शर्ट

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More