बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांसाठी भरती

मुंब | आपली व्यवस्था ही बेरोजगारीने त्रस्त आहे. तरुण वर्गाला प्रचंड मोठ्या मानसिक तणावातून जावं लागत आहे. गेली दीड वर्ष या कोरोना संकटाने शैक्षणिक नुकसान तर झालंच पण त्या पेक्षाही मोठं नुकसान नोकरीच्या संधी कमी झाल्याने झालंय. जिकडे पहावं तिकडे नैराश्यात अडकलेली तरुणाई पहायला मिळत आहे.

नेैराश्यात अडकलेल्या तरुणाईसाठी एक आनंदाची बातमी युनियन बँकेने दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅंकीग क्षेत्रात काम करण्याची संधी हवी होती. त्यांना युनियन बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या या भरतीचा थेट फायदा होणार आहे. आपल्या गुणवत्तेला नोकरीत बदलण्याची सुवर्णसंधी या विद्यार्थ्यांकडे चालून आली आहे.

युनियन बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा फॅार्म भरता येऊ शकतो. नोटिफिकेशन नुसार युनियन बँक भरती 2021 अंतर्गत एकूण 347 एवढी पदे भरली जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस-3 आणि एमएमजीएस -2 व एमएमजीएस-1 श्रेणी अंतर्गत होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. 

युनियन बॅंकेने यासाठी आपली स्वतंत्र प्रणाली वापरत आहे. या भरतीसाठी प्रवेश शुल्क हे सर्वसामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी 850 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी निशुल्क आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 12 ऑगस्ट 2021 पासून झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही 3 सप्टेंबर 2021 आहे.

थोडक्यात बातम्या

‘राहुल गांधींना लोकसभेतून निलंबित करा’; रामदास आठवलेंची मोठी मागणी

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आज मुंबईत लसीकरण बंद!

‘आमदाराच्या मुलीला थार गाडी द्या’; सनी देओलचं थेट आनंद महिंद्रांना पत्र

भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More