Government Job | रक्षामंत्रालयात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी नोकरी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सरकारी नोकरी (Government Job) हे अनेकांचं स्वप्न असतं. काहीजण त्याच्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. अशाच सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रक्षामंत्रालयात (Ministry of Defence) आता मोठ्या संख्येनं भरती प्रक्रिया होत आहे.

संरक्षण मंत्रालायानं मेट आणि फायरमन पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या दोन्ही पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज संरक्षण मंत्रालयानं मागितले आहेत. पात्र उमेदवार AOC च्या अधिकृत बेवसाइट aocrecruitment.gov.in द्वारेदेखील ऑनलाइन (Online) अर्ज करु शकतात.

एकूण 1739 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. नोंदणीची तारीख अजून स्पष्ट करण्यात आली नाही. ट्रेडसमन मेट पदासाठी 1249 तर फायरमन(Fireman) पदासाठी 544 जागा रिक्त आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत (notifications) देण्यात आल्या आहेत.

ट्रेडसमन मेट (Tradesman Mate) या पदासाठी भरती झाल्यास पहिल्या स्तराला तुम्हाला 18,000 ते 56,900 इतका पगार मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्तरावर फायरमन या पदासाठी 19,900 ते 62,200 पगार मिळण्याची शक्यता आहे. नोटीसमध्ये दिल्याप्रमाणे रिक्त असणाऱ्या जागा कमी जास्त होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या